बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा?; काँग्रेसचा थेट सवाल

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढील निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे म्हटलं होतं. त्यावर शिवसेना पक्षाने आपल्या सामनाच्या अग्रलेखातून कोरोना काळात स्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्यानं मारतील, असा टोला काँग्रेसला लगावला होता. अशातच यावर नाटा पटोले यांनी शिवसेनेवर चांगलाच पलटवार केला आहे.

स्वबळाचा नारा केवळ काँग्रेसनंच नाही तर शिवसेनेनंही दिला आहे. पण फक्त काँग्रेसला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा?, असा थेट सवाल नाना पटोले यांनी केला आहे. आज प्रसार माध्यमांशी नाना पटोले यांनी संवाद साधला.

कोरोना काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन काम केलंय. रक्तदान, ऑक्सिजन पुरवठा, मास्क वाटप, प्लाझ्मा दान अशी अनेक कामं काँग्रेसनं केली आहेत. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका करत असेल तर आम्ही त्याला महत्व देत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही जयंत पाटील यांनाही शुभेच्छा देतो की, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी, असं म्हणत नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना टोला लगावला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राबाबत पटोलेंना विचारण्यात आलं. त्यावेळी भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्रास देत असल्याचं आम्ही पाहतोय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. त्याचा काँग्रेस पूर्णपणे निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

देशातील नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा घटला, वाचा आजची आकडेवारी

“केंद्र सरकार जून-जुलै महिन्यांपासून देशातील लसीकरणाचा वेग वाढवणार”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर; तब्बल 123 रुग्णांचा मृत्यू

‘या’ ठिकाणी देशभक्तीपर गीतांच्या तालावर 100 लोकांनी सलग दोन तास केली योगासने

36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही; मराठा क्रांती आंदोलनाबद्दल संभाजीराजेंचं मोठं विधान

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More