महाराष्ट्र मुंबई

‘तुम्ही मर्द असाल तर…’; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई | औरंगाबाद शहराच्या नामंतरावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करा, अशी मागणी केली जात आहे. याच मुद्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

तुम्ही मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ, अशी टीका नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

नामांतराची मागणी आमच्या सरकारने केली मात्र या मागणीला ठाकरे सरकारने पूर्ण न करत केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं. जर ठाकरे सरकार असंच करणार होतं तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनावता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का?, असा खोचक सवाल नितेश राणे यांनी यावेळी केला आहे.

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजप-शिवसेना यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी!

स्व. मोहनलालजी बियाणा पत्रकारिता सन्मान!; राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा

“…तोपर्यंत शिवसेना औरंगाबादचं नामांतर करूच शकत नाही”

प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांना मोठा झटका

राष्ट्रगीत सुरु असताना भारताचा ‘हा’ खेळाडू भावुक; सिडनीच्या मैदानावर अश्रू अनावर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या