बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत, पण…”

सिंधुदुर्ग | गेल्या आठवड्यापासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली. यात राणेंचं नाव महाराष्ट्रातून आघाडीवर आहे. राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. ते भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील अशी शक्यता आहे. नारायण राणे यांना केंद्रीय विस्तारामध्ये मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. यावर शिवसेनेनेही भाष्य केलं आहे.

केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र नारायण राणेंना मंत्रिपद देऊन शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी किंवा शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी नारायण राणेना मंत्रीपद दिल जात असेल तर हा चुकीचा समज असल्याचं शिवसेना पक्षाचे आमदार उदय सामंत यांनी म्हटलं आहे. सिंधुदुर्गमध्ये प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कर्तृत्त्व संपूर्ण जगाला दिसलेलं आहे आणि यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेना काम करत आहे. उद्धव ठाकरे यांचं कतृत्व कोणी कितीही नाकारत असलं तरी देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. त्यामुळे कितीही काही केलं तरी शिवसेनेची कोंडी होऊ शकत नसल्याचं सामंत म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातून नारायण राणे यांचं नाव आघाडीवर असून, यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील साताऱ्याचे खासदार उदयनराजे, गोपिनाथ मुंडेंच्या कन्या डॉ. प्रितम मुंडे, भारती पवार आदी नावेही महाराष्ट्रातून मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

400 फूट खोल दरीत कोसळली कार, पुढे जे घडलं ते ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार- विजय वडेट्टीवार

“राम नामाचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी; राम यांच्यापासून किती लांब आहे, हे स्पष्ट होतंय”

‘या’ जिल्ह्यांना पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; घराच्या बाहेर पडत असाल तर सावधान

शिवसेना सर्टिफाईड गुंडाचा पक्ष, राऊतांच्या वक्तव्यावर अजितदादांनी करुन दिली ‘ती’ आठवण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More