बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#कोरोना! घरी वाफ घेत असाल तर थांबा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना प्राण गमवावे लागले. कोरोनापेक्षा अनेकजण रूग्णालयात गेल्यावर घाबरून गेले त्यामुळे कोरोनावर घरी राहूनच उपचार घेणं अनेकांनी पसंत केलं. घरी उपचार घेताना त्यामध्ये वाफ घेणे, ताप आला की अँटीबॉयोटिक्स आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या खाणे. आता आरोग्य मंत्रालयानं कोरोना उपचारांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

नव्या गाईडलाईन्समध्ये कोरोनाच्या उपचारावेळी हायड्रोक्सोक्लोरोक्वीन, अँटीबॉयोटिक्स आणि व्हिटामिन्स सारखी औषधांचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे वाफ घेण्यास मनाई केली आहे. त्यासोबतच स्टिरॉइड्स, पॅरासिटामॉल आणि ऑक्सिजनच्या योग्य वापरावर भर देण्यात आला आहे. डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्विसेजच्या वेबसाईटवर ही सुधारित गाईडलाईन सूचना देण्यात आली आहे.

नव्या गाईडलाईन्सनुसार ताप आल्यावरच फक्त पॅरासिटामॉल गोळी घ्यावी. कोणतीही झिंक आणि व्हिटामिनची गोळी घ्यायची नाही आणि कोणतेही अँटीबॉयोटिक्स घ्यायचं नाही. कोरोनाच्या आतापर्यंतच्या उपचारात वाफ घेणं महत्त्वाचं मानलं जात होतं. मात्र त्यावर मनाई घालण्यात आली आहे. त्यासोबतच प्लाझ्मा थेरपीवरही बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्विसेजच्या वेबसाईटवर नव्या गाईडलाईन देण्यात आल्या आहेत. उपचाराबाबतचा संपुर्ण अहवाल हा 27 मेला अपलोड करण्यात आल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या- 

“अंगणवाडी सेविका प्रशासनाचा कणा आहेत, तिसरी लाट आली तर तुमची मदत हवी”

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणासंदर्भात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशवासियांशी साधणार संवाद

सकारात्मक बातमी! रविवारी देशात सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

“‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More