बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पालकमंत्र्यांच्या नादी लागाल तर शहरातही दिसणार नाही”

जळगाव | शिवसेना नेते आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. जळगावचेे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पण एक आक्रमक नेते आहेत. ते आपल्या जिल्ह्यातील गुन्हेगारी संपवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. जळगावसह भुसावळ भागातील गुन्हेगारी ही एक मोठी समस्या बनली आहे.

भुसावळ शहरातील गुन्हेगारी ही गोष्ट फार भंयकर वाढली आहे. लहान लहान मुल हे या गुन्हेगारीमध्ये फसत चालले आहेत. 18 वर्ष वय असलेल्या मुलाच्या हातात पण कट्टा आला आहे. भुसावळ शहरातील नगरसेवक पिंटू ठाकुर यांच्या प्रभागातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी गुलाबराव पाटील आले होते. यावेळी त्यांनी वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य केलं.

भुसावळ शहरातील विकास कामात अढथळा आणला जात आहे. भुसावळातील काही प्रवृत्ती अशा आहेत ज्या मुख्य अधिकार्‍यांनाही त्रास देत आहेत. कुणी स्वतःला डाकू समजत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. आमच्या नादी त्यांनी लागू नये, त्यांचे सर्व रेकॉर्ड खिशात असून नादी लागाल तर त्याचा अंदाज बांधू शकत नाही, असा सज्जड दम गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

भुसावळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक करणार आहे. हे गुन्हेगार आता माझ्या रडारवर आहेत. अजूनपर्यंत पालकमंत्री काय आहे ते दाखवलेलं नाही आणि ज्या दिवशी दाखवेल त्या दिवशी हे लोक शहरातही दिसणार नाहीत, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या

“इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि तुम्ही नाव कसलं बदलता”

“नागरिकांना कोरोना लसीचे दोन डोस उपलब्ध करून देणं सरकारचीच जबाबदारी”

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

‘लष्करात भरती करुन आम्हालासुद्धा देशसेवेची संधी द्या’; तृतीयपंथियांची पंतप्रधानांकडे मागणी

केंद्रात काही नेते फक्त भाषणं देतात, गडकरी प्रामाणिकपणे काम करतात- बच्चू कडू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More