बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं”

सातारा | सध्या राज्यात ओबीसीच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. भाजपच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी साताऱ्यातील फलटणमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ज्यांनी आमच्या जीवावर अठरा खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गणा करु नयेत, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

दरम्यान, फलटण तालुका आणि शहराच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी घेतलेल्या या सभेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही खोचक टीका केलेली पहायला मिळाली.

थोडक्यात बातम्या – 

‘…तर Omicron मुळे देशात तिसरी लाट येईल’, IMAचा इशारा

दिलासादायक! Omicron वर औषध सापडलं, शास्त्रज्ञांचा दावा

डेल्टापेक्षा omicron किती घातक?; ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

“संजय राऊत एक नंबरचे डबल ढोलकी, खुर्ची टिकवण्यासाठी…”

महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, ‘इतक्या’ हजार कोटी जणांना मिळणार नोकऱ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More