बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनातून लवकर बरं व्हायचं असेल तर ‘या’ गोष्टी खाण्याच्या टाळा

नवी दिल्ली | कोरोना महासाथीच्या रोगानं गेल्या दोन वर्षापासून थैमान घातलं आहे. त्यामुळे सगळीकडे सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना आणि कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता प्रशानसनानंही कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी आहाराची योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवण्यापेक्षा काहीतरी आरोग्यदायी पदार्थांचं सेवन करावं लागणार आहे.

कुकीज, केक, चॉकोलेट, शीतपेये म्हणजेच कार्बोनेटेड ड्रिंक्स, प्रक्रिया केलेले पदार्थ, ज्यूस असे पदार्थ तर बंद करावेत. फ्रोजन पिझ्झा, बर्गर, समोसा, कुकीज इत्यादी पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट प्रचंड प्रमाणात असतात. त्यामुळं अशा पदार्थांचे सेवन न करणे आरोग्यासाठी गरजेचे आहे.

आजारातून बरे झाल्यानंतर काही महिने घरात शिजवलेलं अन्न खाणेच आवश्यक आहे. पचनाला हलके, पौष्टिक पदार्थ खाणं गरजेचं आहे. ताज्या आणि पचनाला जड नसलेल्या आहारामुळे पचन चांगले होते आणि ताकदही लवकर वाढते.

थोडक्यात बातम्या – 

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आता मुंबईत प्रथमच धावणार…

“मुख्यमंत्री आजारी असताना तुम्ही नामर्दपणे टीका केली”; संजय राऊत भडकले

कोरोनाच्या पुढच्या व्हेरियंटविषयी WHOचा गंभीर इशारा, म्हणाले…

एसटी कर्मचाऱ्यांचं कुटुंबासह ‘भीक मांगो’ आंदोलन, ‘या’ ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या नावाने मागतायेत भीक

Republic Day 2022: शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बाहेर, ध्वजारोहन सोहळ्याला लावली हजेरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More