बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विंचवाच्या बिराडात हात घालणारच असाल तर विंचू चावल्यावर आग होऊ देऊ नका”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज कोल्हापूरला जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यासंबंधात अधिक माहिती घेण्यासाठी सोमय्या कोल्हापूरला जाणार होते. मात्र, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्यांना नोटीस पाठवली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे.

किरीट सोमय्यांना कोणतीही इजा होऊ नये किंवा त्रास होऊ नये म्हणून त्यांना नोटीस देण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे. किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार असतील तर महाविकास आघाडी सरकार त्यांची योग्य काळजी घेईल. परंतु, जर मी विंचवाच्या बिराडात हात घालणारच असं म्हणत असाल तर विंचू चावल्यावर आग होऊ देऊ नका, असा इशारा अमोल मिटकरींनी सोमय्यांना दिला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून किरीट सोमय्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस दिली आहे. त्यामुळे त्यांनी स्वता:ला वाघ वगैरे समजू नये, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे. तसेच भाजप नेते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने किरीट सोमय्यांनी मला अटक करण्यासाठी हा पोलिसांचा फौजफाटा तैनात केला असल्याचं म्हटलं आहे. भाजपकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना किरीट सोमय्यांना स्थानबद्ध केले आहे, असा आरोप ठाकरे सरकारवर केला आहे.

थोडक्यात बातम्या –

कोण आहेत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

‘…अन्यथा किरीट सोमय्यांना जन्माची अद्दल घडेल’; हसन मुश्रीफांचा पलटवार

‘किरीट सोमय्या आंतकवादी आहेत का?’; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

मोठी बातमी! कायरन पोलार्ड करणार मुंबईचं नेतृत्व; रोहित, हार्दिक संघाबाहेर

इवेन्ट ख़त्म! 17 सप्टेंबरच्या लसीकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More