बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयआयटी प्रोफेसर असल्याची बतावणी करून व्यापाऱ्यांना घातला ‘इतक्या’ लाखांना गंडा

नवी दिल्ली | आयआयटी प्रोफेसर असल्याची खोटी बतावणी करून 2 व्यापाऱ्यांना 80 लाख रूपयांना लुटणाऱ्या लुटारू विरोधात दिल्लीच्या चाणक्यपुरीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी राजेश अंबवाणी आणि त्याची साथीदार सलोनी सिंह यांच्याविरोधात फसवणुक तसेच कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरूमानक साहणी आणि जागृती सिंह यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या मते आरोपी राजेश अंबवाणी त्यांना खान मार्केटच्या जिमखाना क्लबमध्ये पार्टी दरम्यान भेटला होता आणि त्याने आपण आयआयटीचा प्रोफेसर असून आर्थीक सल्लागार असल्याचंही सांगितलं होतं. त्यानंतर तो गुंतवणुक करण्यासाठी सारखा सांगत होता. तसेच, काही दिवसांनी साहणी यांनी संबंधित व्यक्तीला फायदा हाेणार या लालसेपोटी 20 लाख रूपये गुंतवणुक करण्यासाठी होकार दिला.

गुरूमानक साहणी आणि जागृती सिंह हे दोघे फ्रेंन्डस कॉलनीमध्ये राहत असून त्यांनी आरोपी राजेश अंबवाणी याच्या म्हणण्यानुसार 2018 मध्ये एडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड या कंपनीत 20 लाख रूपये गूंतवले. या कंपनीत सलोनी सिंह ही काम करत होती. गुंतवणुकीच्या चार पट पैशांचा परतावा मिळेल असं आमिश त्यांना दाखवण्यात आलं.

काही महीने त्यांनी गुंतवणुक केलेल्या रकमेवर त्यांना भरघोस फायदा करून देण्यात आला.  या दोन आरोपींनी त्यांचा चांगला विश्वास संपादित केला. गुरूमानक आणि जागृती यांनी फायदा होतोय म्हणुन अजून पैसे गूंतवणुकीसाठी दिले. मात्र, आता त्यांच्या पैशांचा परतावा मिळताना त्यांना अडचणी येऊ लागल्या, त्यांचं दरमहीन्याला नुकसान होऊ लागलं त्यामुळे आपली फसवणुक झाली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आरोपींविरोधात चाणक्यपुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या मंत्र्याच्या मुलाला झाली कोरोनाची लागण

अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळत नाही- पंकजा मुंडे

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

“हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून मोदींनी ख्रिश्चन परिचारिकेकडून लस घेतली”

बाबो! खेळाडूने हवेत उडी घेत पकडला अफलातून कॅच, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More