Top News आरोग्य कोरोना

कोरोनाने आतापर्यंत 99 डॉक्टरांचा मृत्यू तर 1302 संक्रमित; IMA कडून रेड अलर्ट जारी

मुंबई | देशात कोरोना ग्रस्त रूग्णांचा आकडा वाढतच जातोय. कोरोना रूग्णांना उपचार देणारे डॉक्टरही या आजाराचे बळी पडत असल्याचं समोर आलंय. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा नऊ लाखांच्या पुढे गेला आहे. तर आतापर्यंत देशात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 99 डॉक्टरांचा कोरोनामुळे बळी गेलाय. तर 1302 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यासाठीच डॉक्टरांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माहितीनुसार, मार्चपासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 1302 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. यात 586 प्रॅक्टिशनर डॉक्टर, 566 निवासी डॉक्टर, 100 हाऊस सर्जन आहेत. सर्वाधिक 73 मृत्यू हे 50 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या डॉक्टरांचे झाले असून, ही टक्केवारी 75 टक्क्यांपर्यंत आहे. तर 35 वर्षापर्यंतचे 7 तर 35 ते 50 वयोगटातील 19 डॉक्टरांचा मृत्यू झालाय. त्यानुसार एकूण 99 डॉक्टरांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची नोंद आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलचे अध्यक्ष डॉ.शिवकुमार उत्तुरे यांच्या सांगण्यानुसार, कोरोनामुळे डॉक्टरांच्या झालेले मृत्यू शंभराच्या टप्प्यावर असल्याने डॉक्टरांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. त्यात आता इंडियन मेडिकल असोसिएशनने रेड अलर्ट जारी करत डॉक्टरांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केलंय.

डॉक्टर योग्य ती खबरदारी घेत आहेत मात्र तरीही अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून येतंय. शिवाय काहींचा कोरोनामुळे बळीही जातोय. तेव्हा पीपीई किटच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे आता सरकारने पीपीई किटच्या दर्जावर विशेष लक्ष द्यावं, अशी मागणीही डॉ. उत्तुरे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

‘ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नको’; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राजू शेट्टींनी ताळतंत्र सोडलं ”

‘कोरोना झाल्यास मला सरकारी रूग्णालयातच दाखल करा’; देवेंद्र फडणवीसांनी केला ‘या’ नेत्याला फोन

2019 वर्ल्डकपच्या शेवटी ताण कमी करण्यासाठी बेन स्टोक्सने केलं असं काही…..

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या