बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

GST परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय! 31 ऑगस्टपर्यंत या वस्तूंवर आयात शुल्क माफ

नवी दिल्ली | कोरोनाने देशात थैमान घातलं आहे. देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या काळात जवळजवळ सात महिन्यांनी जीएसटीची बैठक झाली. या बैठकीत कोविडशी संबंधित मालावर आयात शुल्क लावला जाणार नसल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. जीसएसटी परिषदेच्या 43 व्या बैठकीत कोरोना संकटाच्या काळात दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची माहिती दिली.

भारतातील दोन लस उत्पादक कंपन्या सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांना 4500 कोटी रुपये देण्यात आले आहेत. लस उपलब्ध होण्याबाबत जपान आणि युरोपियन संघाच्या लस उत्पादकांशीही सरकार संपर्कात आहे. येत्या काही महिन्यांत लसची पुरेशी उपलब्धता होईल, असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जीएसटी कौन्सिलने 31 ऑगस्ट 2021 पर्यंत कोरोना उपकरणांच्या आयातीवरील जीएसटीला सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटीमध्ये त्वरित सवलत कोविड उपकरणावर देण्यात आलीय. करात सूट देण्यासाठी मंत्रालयांचा एक गट तयार करण्यात आला असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

DNB मेडिसीन परीक्षेत औरंगाबादमधील विद्यार्थ्याचं दैदीप्यमान यश!

कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या डाॅक्टर्सला व्हिडीओच्या माध्यमातून ‘मनापासून साॅरी’, पाहा व्हिडीओ

सेल्फीसाठी काहीही! आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो काढण्यासाठी महिलेने मारले चक्क साडीतच पुशअप्स, पाहा व्हिडीओ

धक्कादायक! कोरोनापासून वाचण्याचा उपाय सांगत त्यानं खाल्ला साप अन्…..

आयपीएलमधील ‘या’ विस्फोटक खेळाडूवर पुण्यात विनामास्कची कारवाई, भरावी लागली 500ची पावती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More