बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनाची तिसरी लाट अटळ पण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाची तिसरी अटळ असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर सी मांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कोरोनाची तिसरी लाट निश्चितपणे येणारच. पण कधी येणार आणि त्याची लक्षणं काय असणार याचा अंदाज लावू शकत नाही, असं शेखर सी मांडे यांनी म्हटलं आहे. ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेने पुढील लाट पाहिलीये. आपल्याला एक संरक्षित दृष्टिकोन ठेवावा लागेल, असंही त्यांनी म्हटलंय.

पुढील लाट येण्याची शक्यता आहे. पण कधी आणि कशी हे अद्याप माहित नाही. व्हायरसचा नवा म्युटंट किंवा कोरोना नियम शिथील केल्यानं हे होऊ शकतं. मात्र सर्वांनी लवकरात लवकर लस घ्यावी जेणेकरून आपल्याला तिसऱ्या लाटेशी सामना करणं सोपं होईल, असा सल्ला शेखर सी मांडे यांनी दिला आहे.

दरम्यान, लसीकरण आणि मास्क घालणं निश्चितपणे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत करेल. तसेच, केरळमधील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचे डेल्टा प्लस व्हेरिएंट जास्त चिंतेचा विषय नाही, असंही त्यांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या-

अजब लग्नाची गजब गोष्ट; अन् चक्क वयाच्या 60 व्या वर्षी आजोबा चढले बोहल्यावर

बलात्कारानंतर आरोपीशी लग्न करण्यासाठी पीडितेची सर्वोच्च न्यायालयात धाव अन्..; चक्रावुन टाकणारा प्रकार

मुंबईकरांनी करून दाखवलं; मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत विक्रमी घट

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीत सुधारणा; पाहा आजचे सकारात्मक आकडे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तब्बल 11 कोटी शेतकऱ्यांना मिळणार मोदी सरकारकडुन प्रत्येकी 2 हजार रूपये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More