बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील शाळा सुरू होणार?; शिक्षण विभागाने दिली महत्वाची माहिती

मुंबई | राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. मात्र राज्यातील शाळा ऑनलाईन माध्यमातूनच सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याबाबत मात्र अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

15 जूनपासून ऑनलाईऩ आणि इतर शक्य माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचण्याच्या सूचना आम्ही देणार आहोत. येत्या दोन दिवसांत यासंदर्भात पत्रक जारी करण्यात येईल. शाळा प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे, अशी माहिती शालेय शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये याचीही खबरदारी घेण्यास सांगण्यात येईल, असं जगताप यांनी सांगितलं. सरसकट सगळीकडे एकाचवेळी शाळा सुरू करता येणार नाहीत. आपल्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात, असंही जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आजही अनेक जिल्ह्यांत कडक लॉकडॉऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे.

थोडक्यात बातम्या- 

राम मंदिर भूखंड घोटाळ्याचा सरसंघचालकांनी खुलासा करावा- संजय राऊत

फोटो शेअर करत एकनाथ खडसेंनी राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नाना पटोलेंनंतर काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा स्वबळाचा नारा

‘2 वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क नको, पण…’; टास्क फोर्सच्या सदस्यांचा पालकांना मोलाचा सल्ला

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं शास्त्रज्ञांचीही उडवली झोप!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More