बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाणीपुरी खवय्यांसाठी खुशखबर! पाणीपुरी खाल्ल्यानं होतो आरोग्याला फायदा

मुंबई | पाणीपुरी म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटत असतं. जेव्हा कधी तुम्हाला तुमच्या जीभेचे चोचले पुरवावेसे वाटतात किंवा चमचमीच खावंसं वाटतं तेव्हा पहिलं नाव पाणीपुरीचं येतं. देशभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी पाणीपुरी ही प्रत्येक शहराच्या नाक्यावर किंवा चौकात खायला मिळते. काहीजण पाणीपुरी आरोग्यासाठी चांगली नसल्याच्या कारणावरून पाणीपुरी खाणं टाळतात. पण पाणीपुरी खाण्याचे भरपूर सारे फायदे आहेत.

पाणीपुरी खाल्यानं तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. पाणीपुरीचा आपल्या आरोग्याला फायदा होतो. बाहेर गेलो किंवा मित्रांनी बोलावलं की आपण पाणीपुरीच्या गाड्यावर जातो. पाणीपुरी खाल्ली की आपल्याला खूप वेळ नंतर भूक सुद्धा लागत नाही. फक्त पाणीपुरी खाल्ल्यावर थोडं चालणं गरजेचं आहे.

पाणीपुरीत असणाऱ्या जलजीरा आणि पुदिनानं तोंड येण्याची समस्या जाणवत नाही. पाणीपुरी खाल्यानं अॅसिडीटीचा त्रास पण होत नाही. पाणीपुरीत सैंधवाचा वापर केल्यानं गॅसच्या समस्येतून सुटका होते. पाणीपुरी खाल्ल्यानं माणसाचा मुडही फ्रेश होतो. स्वच्छ जागेवर असलेल्या हाॅटेलवर किंवा स्टाॅलवरच पाणीपुरी खावी.

दरम्यान, पाणीपुरी आपल्या घरी तयार करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून आपल्याला पोटाच्या आजारापासून सावध राहता येईल. उघड्यावरची पाणीपुरी खाल्ल्यानं तुम्हाला पोटाचे आजार सुद्धा होवू शकतात.

थोडक्यात बातम्या

“शरद पवार भिजल्याची बातमी झाली, पण…”; ‘या’ नेत्याचा पवारांवर हल्लाबोल

“आमची दिवाळी जर अंधारात जाणार असेल तर, मुख्यमंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही”

आर्यन खानचं समुपदेश केलं मग पुरावे द्या! नवाब मलिकांचं NCB ला खुलं आव्हान

“….म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More