मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना (Corona) महामारीने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. जगभरात तसेच देशात बऱ्याच जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.
केंद्र सरकारने लसीकरण मोहीम राबवली आणि आतापर्यंत देशात करोडो लोकांचे लसीकरण पूर्ण झाले. मात्र, दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची संख्या ही अधिक असल्याचं म्हटलं जातंय. पण, जरी दोन डोस घेतले असले तरी सुद्धा तिसरा बूस्टर डोस हे घेणे गरजेचं आहे. बुस्टर डोस हा 9 महिन्यांच्या अंतराने निश्चित करण्यात आला आहे. पण आता यामध्ये सुद्धा काही बदल केले गेले आहेत.
लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट म्हणजे(NTGAI) यांनी गुरुवारी कोरोना लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यामधील अंतर हे 9 महिन्यांचे होते. मात्र, आता ते अंतर कमी करण्यात आले आहे. बूस्टर डोसमधील अंतर आता 6 महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच 6 ते 12 या वयोगटातील मुलांसाठी Covavax आणि Corbevax या डेटाचे देखील पुनरावलोकन करेल.
दरम्यान, देशाच्या औषध नियंत्रक जनरल ऑफ मेडिसिन्स (DCGI) यांनी एप्रिलमध्ये 5 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांसाठी Corbevax वापरण्यासाठी मान्यता दिली आहे. तसेच 6 ते 12 या वयोगटातील मुलांसाठी Covaxin वापरण्यास परवानगी दिली आहे. या दोन विषयांव्यतिरिक्त, NTAGI च्या स्थायी तांत्रिक उपसमितीच्या (STSC) बैठकीच्या अजेंड्यावर मिश्र डोस याला परवानगी देण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
‘अजून किती फोटो काढणार?’; मलायका अरोरा चाहत्यांवर भडकली
चिंताजनक बातमी! देशातील कोरोना रूग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर
“रामाकडे जावा नाहीतर काशीत अंघोळ करा, जनतेच्या मनातून तुम्ही उतरले आहात”
“काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिचिंग यात काहीच फरक नाही”
प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाली…
Comments are closed.