बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महत्वाची बातमी! पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट तयार करणार रशियन कोरोना रस

पुणे | कोरोना संसर्गपासून वाचण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. कोरोनाच्या विरोधातील लढाईमध्ये महत्त्वाची भुमिका निभावणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटबाबत आता एक बातमी समोर येत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना विषाणू विरोधातील रशियन लस स्पुतनिक व्हीच्या उत्पादनासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये रशियन कोरोना लस स्पुतनिक व्हीचं उत्पादन घेण्याची घोषणा कंपनीने केली आहे. ऑक्सफोर्ड, नोवोवॅक्सच्या कोरोना लशीनंतर आता रशियाची कोरोना लसही पुण्यात तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतात एका वर्षामध्ये 300 दशलक्षहून अधिक डोस बनवले जातील. तसेच रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे सीईओ किरील दिमित्रीव यांनी सांगितलंय की, इतर काही निर्माते देखील भारतात या लशीचं उत्पादन करण्यासाठी उत्सुक आहेत.

दरम्यान, रशियाने सर्वात प्रथम या लशीला मंजुरी दिली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून  ही लस नागरिकांना देण्यास सुरुवात झाली. या लशीचे दोन डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर साधारण 21 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो.

 

थोडक्यात बातम्या – 

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा! पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तारीख जाहीर

मी एक अमेरिकन नागरिक असलो तरी माझ्या मनात भारतच- सुंदर पिचाई

राजकीय नाटकं चालतात पण आमची रंगभूमीवरची नाही- केदार शिंदे

“मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळेल अशा काहींच्या अपेक्षा होत्या पण…”

‘मुस्लिम मोहल्ल्यात शाखा उघडणार’; मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More