‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांसह पालकांना ‘हा’ महत्वाचा सल्ला
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या विशेष कार्यक्रमाद्वारे देशातील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला आहे. या संवादात त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांचं निरसन केलं. यामध्ये त्यांनी गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीसारख्या संकटाशी दोन हात करावे लागत असल्याचं सांगितलं. तसेच ही चर्चा फक्त परीक्षेवरच नाही, तर भरपूर विषयांवरही आपण बोलू शकतो आणि हलकं फुलकं वातावरण बनवू शकतो, असंही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात मोदींनी पालकांनाही महत्त्वाचं आवाहन करत सल्ला दिला आहे. मुलगा लहान असताना जसं तुम्ही त्याला अंगाखांद्यावर खेळवता त्याच्यासोबत अगदी लहान बनून खोटं रडता, त्याच्या साठी घोडा बनता त्यावेळी तुम्ही कोण काय म्हणेल? याचा कधीच विचार करत नाही. तुमचा मुलगा मोठा होत असताना त्याला तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकवता मग बाहेरच्या जगामध्ये वावरत असताना तो आणखी कसा खुलेल आणि त्याच्या अडचणी आणि भावना समजून घेऊन त्याच्यावर न ओरडता तुम्ही त्या सोडवल्या पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पालकांना आवाहन केलं.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरंही दिली. यादरम्यानच एका विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नाला मोदींनी अतिशय सुंदर उत्तर दिलं. विद्यार्थिनींनी विचारलं की, भरपूर अभ्यास केला, पण परीक्षेवेळी मात्र काही लक्षातच राहत नाही, त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर देताना म्हटलं की, आपल्याला जर मेमरीची जडीबुटी पाहिजे तर तुम्ही आधी ही भावना मनातून डिलीट करा, की तुम्हाला काही लक्षातच राहत नाही. तुम्ही तसा अजिबात विचार करू नका.
लहानपणापासून आपण अनेक गोष्टी लक्षात ठेवत आलो आहोत त्या गोष्टींचा तर आपल्याला कधीच विसर पडला नाही. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांनी पाठांतरापेक्षा ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या गोष्टीला अनुभवा म्हणजे ती तुमच्या लक्षात राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सल्ला दिला.
थोडक्यात बातम्या –
पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक
“अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?”
सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांवर अनिल परब म्हणाले, ‘बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो…’
लवकरच देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवार यांची भेट!
नागरिकांनो कुटुंबाची काळजी घ्या!; दिल्लीतील डॅाक्टरांचं कोरोनाबद्दल धक्कादायक निरीक्षण
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.