इस्लामाबाद | पाकिस्तान ताहरिके-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सत्तापालट होण्याची चिन्हं दिसत आहेत.
बुधवारी झालेल्या निवडणुकीत 272 जागांसाठी मतदान झाले. त्यात पीटीआयने 112 जागांवर विजय मिळवला आहे. तर नवाज शरिफ यांच्या पीएमएल-एन पक्षाला 65 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. आसिफ अली झरदारी आणि बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 43 जागांवर समाधान मानावं लागलं.
दरम्यान, अधिक जागा मिळाल्याने इम्रान खान यांची पंतप्रधानपदी निवड निश्चित मानली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल
-साष्टांग दंडवत घालतो पण हा हिंसाचार थांबवा- चंद्रकांत पाटील
-नाशिकमध्ये जलसमाधी घेण्यासाठी आलेले 9 जण पोलिसांच्या ताब्यात
-भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु!
-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप