बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इम्रान खान यांनी घेतली चीनची कोरोना लस अन् दोन दिवसातच झाला कोराना

लाहोर | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चानची कोरोनाची लस घेतली मात्र त्यांना दोनच दिवसात कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लस घेऊनही त्यांना कोरोना झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इम्रान खान यांचे असिस्टंट फैजल सुल्तान यांनी त्यांना ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोना झाल्यानंतर स्वत: ला आयसोलेट करून घेतलं असून त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. इम्रान खान यांनी चीनची सिनोफार्म ही कोरोना लस टोचून घेतली होती.

लस घेतल्यावर मात्र अवघ्या दोन दिवसांतच ते कोरोना पॉझिटीव्ह आल्याने चीनच्या लसीवर सुरक्षेबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र पाकिस्तान कोरोनी लसीसाठी पुर्णपणे चीनवर अवलंबुन आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इम्रान खान नियमितपणे सगळ्या बैठकांना हजेरी लावत होते. राजधानी इस्लामाबादमध्ये झालेल्या सुरक्षा विषयक कॉन्फरन्सही ते हजर होते. या कॉन्फरन्सला मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावली होती असं रॉयटर्स वृत्तसंस्थेने सांगितलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानात 10 मार्चपासून लसीकरण मोहीम सुरू झाली असून सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-  

“रात्री 50 मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं मात्र बंगालमध्ये गेल्या 50 वर्षापासून विकास डाऊन”

धक्कादायक! कोरोनाची लक्षणे दिसल्याने थेट तापी नदीत उडी घेत शिक्षकाची आत्महत्या

‘कोरोना रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाले म्हणून…’; ‘या’ मराठी अभिनेत्रीने केला संताप व्यक्त

मास्क नाही घातलं म्हणून केली चौकशी, चिडलेल्या महिलेने केली पालिका कर्मचारिकेची पिटाई, पाहा व्हिडीओ

जॉन अब्राहमवर आली सिनेमाची तिकीटं विकण्याची वेळ, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More