बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इम्रान खानच्या अडचणीत वाढ! पाकिस्तानमध्ये शिया आणि सुन्नी भिडले

इस्लामाबाद | अनेक दिवसांपासून पाकिस्तानमधील इम्रान खान सरकार वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत येताना दिसत आहे. आता पाकिस्तानसमोर अंतर्गत कलहाचं संकट आलं आहे. पाकिस्तानच्या वायव्येकडील आदिवासी भागात दोन जमातींमध्ये मोठा वाद सुरू आहे.

शिया आणि सुन्नी जमातींमध्ये वाद सुरू आहेत. शिया आणि सुन्नी समाजामध्ये तीव्र संघर्ष पेटला आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या या वादामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यु झाला आहे आणि 15 जण जखमी आहेत. यासंदर्भात एएनआयने वृत्त दिले आहे. जंगलातील झाडे तोडणे आणि जमिनीचा ताबा घेणे यावरून हा संघर्ष सुरू आहे.

या दोन जमातीतील संघर्षामध्ये शस्त्रास्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. त्यामुळे याठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात येत आहे. या काही दिवसांमध्ये पाकिस्तानमधील जातीय हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सुन्नी मुस्लिम अनेकदा शिया मुस्लिमांवर हल्ले करतात. पाकिस्तानच्या मुस्लिम लोकसंख्येपैकी 20 टक्के शिया मुस्लिम आहेत.

दरम्यान, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार पाकिस्तानचा समावेश वर्ल्ड जस्टीस प्रोजेक्टच्या अनुक्रमणिकेमध्ये 2021 सालात पाकिस्तान 130 क्रमांकावर आहे. सदर निर्देशांकामध्ये 139 देशांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या- 

“भारतीय चित्रपट सृष्टीला तातडीने स्वच्छ करण्याची गरज, इथं सर्वात जास्त…”

“युद्धपातळीवर आढावा बैठका सुरू पण, येत्या 6 महिन्यात…”

“महाराष्ट्रात होणाऱ्या छाप्यांमागे देवेंद्र फडणवीसांचा हात”

“…मग आर्यन खान दोषी कसा? त्याला पकडणं हा एक ट्रॅप”

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यासह ‘दिवाळी भेट’ही मिळणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More