Top News देश

माजी मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरात चर्चेचा विषय झालेल्या इमरती देवी आघाडीवर

भोपाळ | काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रचारादरम्यान सर्वाधिक वाद आणि चर्चेचा विषय झालेल्या भाजप उमेदवार इमरती देवी मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आघाडीवर आहे.

मध्य प्रदेश विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या आहेत. मध्य प्रदेशच्या डबरा मतदारसंघतील निकालाविषयी अधिक उत्सुकता आहे. कारण कमलनाथ यांनी इमरती देवींवर केलेल्या वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते.

बिहार विधानसभेबरोबरच मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी सुरुवात झाली असून, मतमोजणीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, मतमोजणीच्या सुरुवातीच्या आकडेवारीनूसार भाजप हा आघाडीवर असल्याचे चित्र दिसतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढू नका; तेजस्वी यादव यांचा नेत्यांना इशारा

बिहारमध्ये भाजपचा काँग्रेसला दे धक्का, दुपट्टीने जागांवर आघाडी

बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु होईल- संजय राऊत

मतमोजणीला सुरुवात; कोणाच्या डोक्यावर चढणार मुख्यमंत्री पदाचा मुकुट?

बिहार निवडणूक निकाल- प्राथमिक फेऱ्यांमध्ये महाआघाडी आघाडीवर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या