बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…मग नवाब मलिक तुरूंगात असताना पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का नाही दाखवली? “

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मोठा धक्का देत ईडीने (ED) त्यांची संपत्ती जप्त केली. संजय राऊतांवरील कारवाईनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. राऊतांवरील कारवाईनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली.

पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीदरम्यान राऊतांवरील कारवाई अनावश्यक असल्याचं शरद पवार म्हणाले. पंतप्रधान मोदी व शरद पवारांच्या भेटीवरून एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

तुमचेच मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक होऊन तुरूंगात असताना तुम्ही पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखवली नाही?, असा खोचक सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे. नवाब मलिकांबद्दल काही चर्चा केली नाही म्हणजे त्यांनी काही चूक केली असे तुम्हाला वाटते का?, असा प्रश्न जलील यांनी ट्विट करत विचारला आहे.

दरम्यान, तुम्ही फक्त संजय राऊतांबद्दल चर्चा का केली? तुमच्याच पक्षाचे नवाब मलिक अटकेत असताना संजय राऊत नवाबांपेक्षा जास्त मौल्यवान झाले का?, अशी टीका देखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या XE व्हेरिएंटबद्दल तज्ज्ञांचा धक्कादायक दावा, म्हणाले…

पुतिन यांच्या मुलींविरोधात अमेरिकेने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

काळजी घ्या! महाराष्ट्रासाठी पुढचे काही दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार

मोठी बातमी! किरीट सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल

शिवसेना नेते संजय राऊतांना बोलण्यापासून रोखलं; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More