बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इम्तियाज जलील म्हणतात, “मला आता हालचालींवर लक्ष द्यावं लागेल”

औरंगाबाद | मनसे प्रमुख राज ठाकरे हे गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. राज ठाकरेंनी आता आपला मोर्चा मराठवाड्याच्या राजधानीकडं वळवला आहे. राज ठाकरेंच्या सभेपुर्वीच औरंगाबादमधील वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंच्या सभेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळं मला तिकडं लक्ष द्यावं लागेल, असं वक्तव्य जलील यांनी केलं आहे.

कोरोनामुळं मागील दोन वर्षांपासून आपण लढत होतो तेव्हा काय परिस्थिती होती आणि आता आपण लगेच सर्व विसरलो आहोत. आपण ते सर्व विसरून कशाला महत्त्व देत आहोत याचा विचार व्हायला हवा, असंही जलील म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेला परवानगी देण्यात येऊ नये म्हणून अनेक संघटना मैदानात उतरल्या होत्या. त्यानंतर विविध नियमांच्या अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे. अशात सभेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय”; पडळकरांची शरद पवारांवर जोरदार टीका

“संजय राऊत यांना माझ्या पत्नीची मागी मागावीच लागेल”

“राज ठाकरे तुम्ही संभाजी महाराजांच्या चरणी नाक घासून माफी मागा”

भाषणापूर्वी ‘अशी’ असते राज ठाकरेंची अवस्था, शर्मिला ठाकरेंनी केला खुलासा

“पाणी डोक्यावरून जात असेल तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More