औरंगाबाद महाराष्ट्र

आमची लढाई ही 5 एकर जागेसाठी नाही तर न्यायासाठी होती- इम्तियाज जलील

औरंगाबाद | सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालचा आम्ही आदर करतो. पण आमचे काही आक्षेप आहेत. कोर्टाने मशीदीसाठी 5 एकर जमीन दिली जाईल असं सांगितलं आहे. पण आम्ही इतकी वर्ष लढलो ते 5 एकर जागेसाठी नाही तर न्यायासाठी लढलो, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देशात राहणाऱ्या कोणत्याही मुस्लिमाला पटणारा नाही. कारण या देशातला मुसलमान तितका सक्षम आहे की उत्तरप्रदेशच काय तर देशातल्या कोणत्याही राज्यात जागा खरेदी करून मशीद बांधू शकेल, असंही इम्तियाज जलील म्हणाले.

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. यात अयोध्यातली वादग्रस्त जागी राम मंदीर बनेल. तर मशीदीसाठी 5 एकर पर्यायी जागा दिली जाईल, असा निर्णय देण्यात आला आहे. त्यावरच इम्तियाज जलील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

अल्लाहच्या घरासाठी 5 एकराची जागा नाही खरेदी करण्यासाठी आम्हाला कुणाच्या भीकेची गरज नाही. मी जर हैदराबादमध्ये जाऊन भीक मागितली तरी मी 5 एकर जमीन खरेदी करू शकतो आणि मशीदही बांधू शकतो, असं मत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनीही व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या