बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भर पत्रकार परिषदेत अनिल परब यांचा पडळकरांना टोला, म्हणाले…

मुंबई | तब्बल 15 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यातील एसटीचा संप मिटण्याच्या वाटेवर आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकारकडून सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आल्याची घोषणा आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. पगारवाढीसोबतच इतर अनेक घोषणा सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

राज्याच्या इतिहासातील सर्वात जास्त पगारवाढ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अशातच या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी गोपीचंद पडळकरांना टोला लगावला आहे.

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची भाषणं ऐकून कर्मचारी कंटाळलेत आहेत, असा टोला परब यांनी पडळकर आणि खोत यांना लगावला आहे. एसटीच्या इतिहासात कधीच अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती, असंही अनिल परब म्हणाले आहेत.

दरम्यान, लालपरी हा राज्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लालपरीच्या जोरावरच ग्रामीण भागातील शिक्षणाचा विकास झाला आहे. सरकारकडून संप मागं घेण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परिणामी आता कर्मचारी संप मागं घेणार का याकडं सर्वाचंच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या 

डीजेच्या आवाजामुळे 63 कोंबड्यांचा मृत्यू, मालकाने थेट पोलीस स्टेशन गाठलं

‘या’ महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार; राजेश टोपेंचा गंभीर इशारा

23 वर्षीय तरुणीचा 14 वर्षाच्या मुलावर बलात्कार, तर बहिणीवर प्रियकराचे अत्याचार

“राष्ट्रवादीला निवडणुकांमध्ये अधिक जागा मिळाव्यात अशी तरुणांची अपेक्षा”

जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दरोडा, एकाला थेट गोळी घातली, पाहा व्हिडीओ-

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More