Top News

अमेरिकेत कोरोनाची दहशत; 24 तासांत 100 जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन | अमेरिकासुद्धा कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. महासत्ता असलेल्या या देशात 24 तासांत 100 जणांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

अमेरिकेत कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 389वर गेली आहे. जॉन हॉपकिन्स विश्वविद्यालयानं मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी जारी केली आहे. आतापर्यंत सर्वाधिक न्यूयॉर्कमध्ये 114, वॉशिंग्टन मध्ये 94 आणि कॅलिफोर्नियात 28 जणांचा मृत्यू झाला असून हे तिन्ही प्रांत कोरोनानं प्रभावित झालेले आहेत.

अमेरिकेत जवळपास 30 हजार लोक या विषाणूनं संक्रमित झाले आहेत. विशेष म्हणजे संक्रमित होणाऱ्यांमध्ये अमेरिकेच्या सिनेटर रँड पॉल यांचाही समावेश आहे. रविवारी केलेल्या चाचणीत रँड पॉल पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दरम्यान, पॉल यांच्या ऑफिसकडून ही माहिती देण्यात आली आहे. पॉल हे कोविड 19 विषाणूनं संक्रमित झाले आहेत. पण त्यांची प्रकृती ठीक आहे. रँड पॉल हे कोरोनानं संक्रमित झालेले अमेरिकेतले पहिले सिनेटर आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

लढवय्या शिलेदाराच्या पाठीवर जयंत पाटलांची कौतुकाची थाप

कौतुकास्पद! कोरोनावर मात करण्यासाठी आनंद महिंद्रांनी घेतले हे निर्णय

महत्वाच्या बातम्या- 

चीन अत्यंत गुप्त पद्धतीने वागतो; ट्रम्प चीनवर संतापले

मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा 3 वर

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी जिओचा खास प्लॅन लाँच; मिळणार तब्बल 102 जीबी डेटा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या