बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाकाळात कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेत बँकिंग सेक्टरला मात्र अच्छे दिन; नफ्यात दुपटीने वाढ

नवी दिल्ली | गेल्या दीड वर्षांपासून देशभरात कोरोनाने थैमान घातलं असतानाच भारताची अर्थव्यवस्था कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु, याच काळात अर्थव्यवस्था कोलमडली असताना बँकिंग सेक्टरला मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात बँकिंग क्षेत्राला 1 लाख 2 हजार 252 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. 2019 या आर्थिक वर्षामध्ये भारतीय बँकिंग क्षेत्राला जवळपास पाच हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागलं होतं. पण 2020 मध्ये मात्र लॉकडाऊन असतानादेखील बँकिंग क्षेत्राला अच्छे दिन आल्याचं पाहायला मिळत आहेत.

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला 31 हजार 116 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. जो संपूर्ण बँकिंग क्षेत्राच्या नफ्याच्या तुलनेत 30 टक्के एवढा आहे. देशाचा जीडीपी गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच नीचांकी पातळी गाठत असताना मात्र मालामाल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे यंदा स्टेट बँक ऑफ इंडिया 20 हजार 410 रुपये नफा झाला असून एकूण खर्चाच्या तुलनेत एसबीआय 20 टक्के नफा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने खासगी बँकासह सरकारी बँकांना नफा झाल्याने बँकिंग क्षेत्राला अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या

 

 

 

 

 

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More