मुंबई | मध्यंतरी बाॅलिबूड कलाकारांनी आंतरराष्ट्रीय कलाकारांना प्रतिउत्तर देण्यासाठी ट्विटरवर इंडिया टुगेदर नावाची मोहिम चालवली होती, त्यात बाॅलिबूड अभिनेता अजय देवगन देखील सहभागी झाला होता. ही मोहिम शेतकरीविरोधी होती, असा आरोप त्यावेळी झाला होता, या मोहिमेत सहभागी झालेल्या कलाकारांवर सोशल मीडियाद्वारेच मोठी टीकेची झोडही उठली होती. आता रस्त्यावरही या कलाकारांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
2 मार्च रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अजय देवगन त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी गोरेगाव ईस्टच्या फिल्म सिटीत जात होता. याच वेळी एक शेतकरी आंदोलक त्याच्या गाडीसमोर येऊन उभा राहिला आणि त्याने अजयची गाडी थांबवली. शेतकरी आंदोलनावर तू बोलत का नाहीस? असा प्रश्न त्याने विचारला. त्याच्या साथीदारांनी हा व्हिडीओ शूट केला, आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
शेतकरी आंदोलकाने अजयची गाडी जवळजवळ 15 मिनीट अडवून धरली होती. राजदीप सिंग असं या शेतकऱ्याचं नाव आहे. “तुला जेवण कसं पचतं? तू पंजाबींच्या विरोधात आहेस. लाज वाटू दे… लाज वाटू दे… ” अशा शब्दात त्याने 15 मिनीट अजयची शाळा घेतली. त्यानंतर घटनास्थळी पोहचताच पोलिसांनी अजयला फिल्मसिटीत पोहचवले तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं.
दरम्यान, संबंधित व्हिडीओ व्हायरल होताच ट्विटरवर नेटकऱ्यांनी अजय देवगनवर टीका चालू केली आहे. ट्विटरवर #अजय_देवगन_कायर_है असा ट्रेंड चालू झाला तर दुसरीकडे अजयच्या समर्थकांनी #नेशन_स्टॅन्ड_विथ_सिंघम अशी मोहिम चालवली आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलन करणारे शेतकरी काही केल्या आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत, तर दुसरीकडे केंद्र सरकारला देखील मध्यस्थीची भूमिका मान्य नाही. त्यामुळे हे आंदोलन बराच काळ चालू राहण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडीओ-
This is sheer injustice by @DGPMaharashtra
The person in the video, Rajdeep Singh Dhaliwal, has only expressed his displeasure against @ajaydevgn stand against Farmers. Is that an offence? A crime? How could Police even file a case against him U/S 341, 504,506 IPC (FIR No 119) pic.twitter.com/GmBqT0goq0— Manjinder Singh Sirsa (@mssirsa) March 2, 2021
थाेडक्यात बातम्या-
पूजा चव्हाण प्रकरणात समोर आला पुणे पोलीस आयुक्तांचा अत्यंत धक्कादायक व्हिडीओ
आणीबाणी ही काँग्रेस सरकारची चुक होती- राहुल गांधी
धक्कादायक!; मंत्र्याचे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं एकच खळबळ
छप्पन इंच छातीचे पंतप्रधान असताना खासदारच असुरक्षित- नाना पटोले
सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी
Comments are closed.