बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अण्णा हजारे यांच्या तब्येतीबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

पुणे | महाराष्ट्राच्या मातीतील हिरा म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांना ओळखण्यात येतं. अण्णा हजारे म्हणजे महात्मा गांधींच्या विचारांना वाहून घेतलेलं एक मोठं नाव आहे. अण्णा हजारे आपल्या सामाजिक कार्यासाठी सर्वत्र परिचित आहेत. देशातील सर्वात मोठं जनआंदोलन उभारण्यात आण्णांचा मोठा हात होता. अशातच आता अण्णा हजारे यांच्या तब्येतीत ( Issue Of Health) बिघाड झाल्यामुळं ते रूग्णालयात दाखल झाले होते. पण आता सध्या काळजी करण्यासारखं कारण नाही, असं डाॅक्टरांनी सांगितलं आहे.

अण्णा हजारे हे सातत्यानं सामाजिक कार्यात दाखल असतात. राज्यासह देशातील नागरिक अण्णा हजारे यांच्याकडे समस्या घेऊन येत असतात. शेतकरी, कष्टकरी, सामाजिक, राजकीय विविध प्रश्नांवर अण्णा हजारे सातत्यानं आवाज उठवतात. अण्णा हजारे यांचं वय सध्या 85 आहे. या वयातही अण्णा हजारे यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिलं आहे.

अण्णा हजारे यांना काही तपासण्या करण्याकरता रूबी हाॅल क्लिनीक येथे दाखल करण्यात आलं होतं. अण्णा हजारे यांना रूग्णालयात दाखल करताच सर्व स्तरातून त्यांच्या तब्येतीची विचारपूस होत होती. रूबी हाॅलच्या डाॅक्टरांनी अण्णांची तब्येत आता चांगली असल्याचं स्पष्ट केलं आहे. अण्णा हजारे यांच्या नियमित तपासण्या करण्यात आल्या असल्याचंही डाॅक्टरांनी सांंगितलं आहे.

दरम्यान, अण्णा हजारे यांच्या तब्येतीची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्यानंतर देशाच्या उपराष्ट्रपतींपासून ते राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांनी अण्णांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

थोडक्यात बातम्या 

“लवकरच महाराष्ट्रात बदल दिसेल, भाजपचं सरकार येणार”

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची सर्वत्र दहशत, केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

कोल्हापूरचा गडी बिनविरोध जिंकला! पाटील यांचा मार्ग मोकळा

“…मग संविधान पाळण्याचं नाटक कशासाठी?”, राऊतांचा खोचक सवाल

लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळले जोडप्याचे मृतदेह अन् उडाली खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More