बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दहावी-बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर राज्यातील शाळा-महाविद्यालय बहरलेली आहेत. अशात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यास उशीर होत असल्यानं पालक नाराजी व्यक्त करत आहेत.

बोर्डाचा निकाल हा नेहमीपेक्षा उशीरा लागण्याची चिन्ह तर होतीच पण आता याबाबत एक माहिती समोर येत आहे. दहावी आणी बारावीचे सर्व पेपर तपासून पुर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळानं दिली आहे. परिणामी निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळं ऑनलाईन झालेलं शिक्षण तरी ऑफलाई परीक्षा घेण्यात आल्या. यावेळी बराच गोंधळ देखील उडाला होता. त्यानंतर आता निकालाचं सर्वांना वेध लागलं आहे. पेपर तपासणी झाल्यानंतर आता निकाल तयार करण्याचं काम अंतीम टप्प्यात असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत लागण्याची तर बारावीचा निकाल हा 10 जूनपर्यंत लागण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या – 

श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी! महिंदा राजपक्षेंचा राजीनामा

सत्र न्यायलयाचा राणा दांपत्याला दणका; अटींचं उल्लंघन अंगलट येणार?

संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? किरीट सोमय्यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

…अन् संजय राऊत आणि अजित पवार आपापसातच भिडले

काय सांगता? सोनाक्षी सिन्हाने गुपचूप साखरपुडा उरकला? ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More