बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये 7 कोटींसाठी विचारण्यात आला ‘हा’ प्रश्न; पाहा व्हिडीओ

मुंबई | ‘कौन बनेगा करोडपती’ या छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोला भरपूर पसंती मिळत असते. नुकतंच नव्या सिझनची सुरुवात झाली असून सोशल मीडियावर त्याच्या चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता या खेळात 1 कोटी रुपयांपर्यंत पोहचलेल्या हिमेला बुंदेला यांची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे.

कौन बनेगा करोडपतीच्या खेळात 1 कोटी रूपयांपर्यंत पोहचून सात कोटींच्या प्रश्नावर हिमेला बुंदेलाने खेळ सोडला. या सीझनमध्ये 1 कोटी रुपये जिंकलेल्या हिमेला बुंदे या पहिल्या स्पर्धक होत्या. त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतूक होत आहे. मात्र हिमानीला सात कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. तिने एक कोटी रुपये घेऊन गेम क्वीट करण्याचा निर्णय घेतला.

एक कोटी रुपये जिंकून सात कोटींच्या प्रश्नावर अडकलेल्या हिमेलाच्या प्रश्नाकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. हिमेला बुंदेलाला सात कोटींसाठी विचारलेला प्रश्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समध्ये सादर केलेल्या प्रबंधाचं शीर्षक काय होतं? ज्यासाठी त्यांना 1923 साली डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर देता न आल्यानं हिमेलाला हा खेळ सोडावा लागला.

दरम्यान, प्रश्न ऐकल्यानंतर उत्तराबाबत हिमेला थोड्या संभ्रमात दिसल्या. अचूक उत्तर माहित नसल्यानं त्यांनी खेळ सोडण्याचा विचार केला. मात्र त्यांनी 1 कोटीची रक्कम जिंकल्यानं त्यांची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा पहायला मिळत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

‘स्वत:च्या राजकारणासाठी…’; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा विरोधकांना सल्ला

अफगाणिस्तानात नवं सरकार स्थापनेच्या हालचाली; राष्ट्रपती पदासाठी ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर

संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ! ‘इतक्या’ शस्त्रधारी जवानांचं राऊतांना संरक्षण

शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय; जवळच्या मैत्रिणीने केला ‘हा’ खुलासा

जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टेस्ला लवकरच भारतीय बाजारात; ‘या’ चार इलेक्ट्रिक गाड्यांना मंजुरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More