बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्रात पुढील एक-दोन महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते’; आरोग्य विभागाचा इशारा

मुंबई | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी 16 जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक पार पडली. त्यावेळी दुसरी लाट आटोक्यात आली असली, तरी तिसऱ्या लाटेचा धोका तज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात ‘डेल्टा प्लस’ प्रकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच कारण बनू शकतो, अशी शक्यता देखील तज्ञांनी व्यक्त केली आहे.

‘डेल्टा व्हेरिएंट’मुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रूग्णांची संख्या पहिल्या लाटेपेक्षा खूपच वाढली. पहिल्या लाटेत राज्यात सुमारे 19 लाख आणि दुसऱ्या लाटेत सुमारे 40 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये रूग्णांची संख्या याही पेक्षा जास्त असून, तिसऱ्या लाटेत आठ लाख सक्रिय रूग्ण असू शकतात. त्या रूग्णांपैकी त्यामध्ये दहा टक्के मुलेही असू शकतील, असं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेला मर्यादित कसं ठेवायच ते आपल्या हातात आहे. आपण गर्दीची ठिकाणे टाळली पाहिजेत आणि दोन मास्कचा वापर केला पाहिजे. जर आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर तिसरी लाट मोठी होईल, असं टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी म्हटलं आहे.

देशभरात होणाऱ्या काेरोना मृत्यूंपैकी 20 टक्क्यांहून अधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. एकंदरीत भारतामध्ये आजपर्यंत झालेल्या 3.4 लाख काेरोना मृत्यूंपैकी 30 टक्के राज्यातील आहेत. राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे.

थोडक्यात बातम्या-

लपत छपत येत महिलेवर हात उचलण्यात कसला आलाय पुरूषार्थ?- चित्रा वाघ

उद्धव ठाकरेंचं सरकार हे गुंड सरकार- किरीट सोमम्या

मनसुख हिरेन प्रकरणात नवं वळण; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचा छापा

“…तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावं लागेल”

…तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल- प्रकाश आंबेडकर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More