मुंबई | ट्रॅफिक पोलिसांसोबतच्या वादाचे प्रकार रोज पाहायला मिळतात. वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते त्यावेळी अनेकदा वाद होतात आणि ते शिगेला पोहचतात. मात्र मुंबईमध्ये मंंगळवारी निंदनीय प्रकार घडला आहे. चार तृतीयपंथीयांनी मिळून वाहतूक पोलिसाला मारहाण करत त्याचा गणवेश फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
विक्रोळी वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या विनोद सोनवणे यांना ही मारहाण झाली आहे. घटनेनंतर विनोद सोनवणे यांनी पंतनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विनोद सोनवणे यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की, तीनहून अधिक प्रवासी एका ऑटो रिक्षातून प्रवास करताना मला दिसले त्यांनी वाहतुकीचे नियम मोडल्याने मी त्यांची रिक्षा थांबवली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे रिक्षाचालकांना नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मी कारवाईसाठी रिक्षाचा फोटो काढला. त्यानंतर रिक्षातील एक तृतीयपंथी खाली उतरुन सोनवणे यांच्याशी हुज्जत घालायला लागला.
विनोद सोनवणे तृतीयपंथी यांच्यातील वाद शिगेला पोहोचला. त्यानंतर रिक्षातील दोन्ही तृतीयपंथी उतरत त्यांनी सोनावणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तृतीयपंथ्यांनी सोनवणेंना लाथाबुक्क्यांनी मारलं यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. तृतीयपथ्यांनी मारहाण करताना सोनावणेंचा गणवेशही फाडला आणि त्यांच्या हातातील वॉकीटॉकी हिसकावून घेत खाली जमिनीवर फेकली.
दरम्यान, याप्रकरणी संंबंधित तृतीयपंथ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये लवली करण पाटील, विकी रामदास कांबळे, तनू राज ठाकूर आणि जेबा जयंत शेख अशी या चार तृतीय पंथीची नावे आहे. या सर्वांविरोधात आयपीसीच्या कलम 353, 332, 294, 427, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
थोडक्यात बातम्या –
तहानलेल्या सापाला वनाधिकाऱ्याने बाटलीने पाजलं पाणी, पाहा व्हिडिओ
फास्ट-टॅगवरून मनसे नेत्या रूपाली ठोंबरेंचा टोल नाक्यावर राडा, व्हिडीओ व्हायरल!
…म्हणून महाराष्ट्रात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं- आशिष शेलार
शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाणार असाल तर सावधान!
एकाच गावातील तरुण-तरुणीच्या आत्महत्येनं खळबळ; पाहा काय आहे प्रकरण