बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज कुंद्रा प्रकरणात आता ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली…

मुंबई | सध्या ट्रेंडिंग असलेला विषय म्हणजे राज कुंद्रा प्रकरण. फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि तेव्हापासूनच राज कुंद्रा तपास यंत्रणांच्या रडारवर आला. अखेर 19 जुलै रोजी राज कुंद्राला अटक झाली. याविषयी सध्या अनेकजण समोर येत धक्कादायक खुलासे करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं याप्रकरणात गौप्यस्फोट केला आहे.

मराठमोळी अभिनेत्री मनिषा केळकरनं एका मुलाखती दरम्यान आपल्याला आलेल्या अनुभवाचा खुलासा केला आहे. मनिषानं म्हटलं की, राज कुंद्राचं प्रोडक्शन हाऊस हे एक नावाजलेलं नाव असल्यानं मी एकदा त्यांना भेटले होते. त्यावेळी त्यांनी मला व्हिडीओ शूट करणार असल्याचं सांगितलं आणि फोटोची मागणी केली. मी याविषयी त्यांना सविस्तर विचारलं असता राजच्या सहकाऱ्यानं मला समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यामुळे मी या ऑफरला नकार कळविला.

पुढे मनिषानं सांगितलं की, एखाद्या वेब साईडवर आपले फोटो आणि व्हिडीओ टाकले जाणार या विचारानंही मला नकार देण्यास भाग पाडलं. नाहीतर आज मीही या प्रकरणात अडकले असते.

दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने पॉर्न फिल्म रॅकेट उघड केलं. या प्रकरणात पाच लोकांना अटक करण्यात आली. जसा जसा तपास पुढे जात गेला तसं या प्रकरणात अटक होत गेली आणि नवनवीन धागेदोरे सापडत गेले.

थोडक्यात बातम्या –

उभे राहून पाणी पिणे ‘या’ 7 कारणांमुळे ठरेल घातक, होतील ‘हे’ विकार

राज कुंद्रानंतर आता आणखी एका कंपनीची होणार चौकशी, बजावला समन्स

धक्कादायक! अन् पूराच्या पाण्यात चक्क ब्रिज वाहून गेला, पाहा व्हिडीओ

भारतीय कुस्तीपटूंचा निर्णायक डाव; दीपक पुनिया आणि रवी दहिया सेमीफायनलमध्ये दाखल

MPSCच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी; अखेर परीक्षेची तारीख ठरली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More