100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांची सारवासारव, म्हणाले…
मुंबई | राज्यातील राजकारण विविध मुद्यांनी चांगलंच गाजत आहे. यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) कुटुंबीयांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा(Toilet Scam) केला असून लवकरच हा घोटाळा बाहेर काढण्यात येईल असा इशारा दिला होता. यावर आता किरीट सोमय्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रशासनाकडून कारवाई होण्याआधीच सोमय्या यांनी विविध विभागांना पत्र पाठवून आपली बाजू स्पष्ट करत राऊतांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या पत्रात किरीट सोमय्या यांनी म्हटलं, भाजप, युवक प्रतिष्ठान, प्रा. मेधा सोमय्या, डॉ. किरीट सोमय्या यांनी कोणताही अशा प्रकारचा शौचालय घोटाळा केला नाही.
माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. कोणत्या आधारावर 100 कोटींचा घोटाळा झाला असा प्रश्नही सोमय्या यांनी विचारला. हा 100 कोटींचा आकडा आला कुठून असंही सोमय्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मिरा भाईंदर शहरात एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी ! लोटे एमआयडीसीत पुन्हा भीषण आग, कोट्यावधींचं नुकसान
कोल्हापूरच्या निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
रशियाकडून युक्रेनच्या 8 शहरांवर हल्ला, ‘इतके’ हजार नागरिक बंदी करण्यात आले
उन्हाळ्यात आजारांपासून वाचण्यासाठी ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी, वाचा सविस्तर
अभिनेता सिद्धार्थची पोस्ट चर्चेत; लाडक्या लेकींसोबत फोटो शेअर करत म्हणाला…
Comments are closed.