बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जीवाचं रान करून 16 कोटी जमवले, इंजेक्शनही दिलं पण….; चिमुकल्या वेदिकाची झुंज अपयशी

मुंबई | काही दिवसांपूर्वी एका चिमुकलीला 16 कोटी रुपयांच्या औषधाची गरज असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर नेटकऱ्यांनी या पोस्टला तुफान प्रतिसाद देत तब्बल 16 कोटी रुपये जमा केले होते. त्यानंतर त्या चमुकलीला 16 कोटीचं औषध दिलं गेलं आणि डाॅक्टरांनी तिच्यावर उपचार केले आणि ती अखेर नीट झाली होती.

पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या चिमुकल्या वेदिका शिंदेला फेब्रुवारी महिन्यात श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याचबरोबर तिला इतर त्रास देखील जाणवू लागले. त्यानंतर तिच्या पालकांनी तिला डाॅक्टरांकडे नेलं. त्यानंतर तिला स्पायनल मस्कुलर एॅट्राॅफी हा दुर्मीळ आजार झाल्याचं सांगितलं. तिच्या उपचारासाठी 16 कोटीचं इंजेक्शन लागणार होतं. वेदिकाच्या पालकांकडे उपचारासाठी पैसे नसल्यानं त्यांनी सोशल मीडियावर मदतीचं आवाहन केलं. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला.

तिच्या आई वडिलांनी पैसे जमा केले. त्यानंतर सोशल मीडियावरून लोकांनीही पैसे जमा केले आणि वेदिकाच्या आई वडिलांपर्यंत पोहचवले. त्यानंतर अमेरिकेवरून झोलगेन्स्मा इंजेक्शन आयात करण्यात आलं आणि अखेर तिला इंजेक्शन देण्यात आलं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात हे इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा होत होती.

दरम्यान, रविवारी अचानक तिची प्रकृती खालावली. त्यानंतर तिने जगाचा निरोप घेतला. तिचे वडिल सौरभ शिंदे यांनी याची माहिती दिली आहे. इंजेक्शन दिल्यानंतर देखील तिची प्रकृती काही काळ खालावली होती. त्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण रविवारी तिच्या वडिलांनी दिलेल्या धक्कादायक माहितीने नेटकऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोनाची तिसरी लाट अटळ पण…’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

अजब लग्नाची गजब गोष्ट; अन् चक्क वयाच्या 60 व्या वर्षी आजोबा चढले बोहल्यावर

बलात्कारानंतर आरोपीशी लग्न करण्यासाठी पीडितेची सर्वोच्च न्यायालयात धाव अन्..; चक्रावुन टाकणारा प्रकार

मुंबईकरांनी करून दाखवलं; मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत विक्रमी घट

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीत सुधारणा; पाहा आजचे सकारात्मक आकडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More