बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पवनदीप राजन ठरला 12 व्या सिझनचा इंडियन आयडॉल!

मुंबई | सर्वात लोकप्रिय सिंगिंग रियलिटी शो ‘इंडियन आयडाॅल 12’ ची सर्वत्र तुफान चर्चा रंगलेली आहे. सोशल मीडियावर सगळीकडे याचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. यावर्षीचा विजेता कोण होईल याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या असतानाच काल रात्री 12 नंतर या विजेत्याची घोषणा करण्यात आली. 

पवनदीप राजन हा ‘इंडियन आयडाॅल 12’ चा विजेता ठरला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पवनदिपला ही खास भेट मिळाली आहे. पवनदिप विजेता असल्याचं घोषित होताच सगळीकडे आनंदाची लहर निर्माण झाली. पवनदीपच्या चाहत्यांचा तर खुशीचा ठिकाणाच राहिला नाही. सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

इंडियन आयडॉल 12 च्या सहा फायनलिस्ट्समध्ये चांगलीच चुरस रंगली होती. मात्र सर्व स्पर्धकांना मागे टाकत इंडियन आयडॉलच्या 12 व्या सिझनच्या ट्रॉफीवर पवनदीप राजननं आपलं नाव कोरलं. इंडियन आयडल 12′ ची चकाकती ट्राफी आणि 25 लाखांची रक्कम देऊन पवनदीपला गौरविण्यात आलं.

दरम्यान, विजेत्या ठरलेल्या पवनदीपला एका म्युझिक कंपनीसोबत गाणं गाण्याची संधी देखील देण्यात येणार आहे. अरूणिता कांजीलाल ही उपविजेती ठरली. यानंतर तिसऱ्या नंबरवर सायली कांबळेनं आपलं नाव नोंदवलं आहे. इंडियन आयडाॅल शोमध्ये द ग्रेट खलीही उपस्थित होता. शोमध्ये खलीला पाहून सर्वजण हैराण झाले होते. शोचे जज अनु मलिक, सोनू कक्करही उपस्थित होते. सध्या सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

“इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि तुम्ही नाव कसलं बदलता”

“नागरिकांना कोरोना लसीचे दोन डोस उपलब्ध करून देणं सरकारचीच जबाबदारी”

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

‘लष्करात भरती करुन आम्हालासुद्धा देशसेवेची संधी द्या’; तृतीयपंथियांची पंतप्रधानांकडे मागणी

केंद्रात काही नेते फक्त भाषणं देतात, गडकरी प्रामाणिकपणे काम करतात- बच्चू कडू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More