बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इकडं सुनेची ईडीकडून चौकशी तर संसदेत सासू भाजपवर कडाडल्या

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी पनामा पेपर्स प्रकरण चांगलंच गाजलं होतं. पनामा पेपर्स लीकमध्ये (Panama Papers leaked) भारतातील 500 हून अधिक नागरिकांची नावं आहेत. या प्रकरणात अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी गैरमार्गाने पैसा परदेशात ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. अशातच बाॅलिवूडची स्टार अभिनेत्री ऐश्वर्या राॅय बच्चनला (Aishwarya Rai) ईडीने समन्सकडून बजावण्यात आलं होतं.

पनामा पेपर्स प्रकरणी ऐश्वर्या राॅयला ईडी कार्यालयात बोलावलं होतं. यानंतर ऐश्वर्या चौकशीत सहभागी होण्यासाठी ईडीच्या दिल्ली कार्यालयात पोहोचली होती. ऐश्वर्याची ईडीने तब्बल 5 तास चौकशी केली आहे. नुकतीच ही चौकशी पुर्ण झाली आहे. पाच तास चौकशीनंतर ऐश्वर्या राॅयला सोडण्यात आलं आहे. अशातच याच मुद्द्यावरून ऐश्वर्या राॅयच्या सासू आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन संसदेत भाजपवर संतापल्याचं पहायला मिळालं आहे.

लवकरच तुमचे वाईट दिवस येणार आहेत. मी शाप देते, असं जया बच्चन भाजप खासदारांना उद्देशून म्हणाल्या आहेत. संसदेत काही भाजप खासदारांनी वक्तव्य केली असल्याचा आरोप जया बच्चन यांनी केला आहे. त्यानंतर राज्यसभेत गोंधळ उडाल्याचं देखील पहायला मिळालं होतं. वयक्तीत बाबतीत बोल्याने मी नाराज झाले होते, असंही जया बच्चन म्हणाल्या आहेत.

दरम्यान, अमिताभ यांनी भारतीय नियमांनुसारच परदेशात पैसे पाठवले असल्याचं सांगितलं होतं. पनामा पेपर्समध्ये समोर आलेल्या कंपन्यांशी संबंध नसल्याचाही त्यांनी याआधी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता ऐश्वर्या राॅयला या प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

कुत्री-माकडांचं टोळीयुद्ध संपलं! दहशत माजवणारी माकडं अखेर जेरबंद

“माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, मी ‘त्या’ नेत्यांसारखा नाही जे…”

“स्वत:ला मोठा नेता म्हणे, तुम्ही सव्वाशेर नाही आता पावशेर झालात”

“माझे 30-35 आमदार होऊ द्या, 10 मिनिटात गंमत करून दाखवतो”

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ ठिकाणी उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More