बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भूतकाळात भारताचं लसीकरण संथगतीने चालायचं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | कोरोना महामारीची दुसरी लाटी आटोक्यात येत असताना दिसत आहे. त्यामुळे काही राज्यांनी अनलॉकच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपली लढाई सुरु आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांना गमावलं त्यांचाबद्दल माझ्या मनात संवेदना आहेत. कोरोना ही गेल्या शतकातील सर्वात मोठी महामारी असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यावेळी लसीकरणाबाबत बोलताना भूतकाळात भारताचं लसीकरण संथगतीने चालत असल्याचं मोदी म्हणाले.

भारतात मेडिकल ऑक्सिजनची मागणी वाढली आहे, सर्व यंत्रणा कोरोनाविरोधी लढ्यात सहभागी झाल्या. जगाच्या कानाकोपऱ्यातून ऑक्सिजन मिळवण्यात आला. कोरोना लढ्यातील सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे कोरोनाचे नियम पाळणे, मास्क, सुरक्षित अंतर पाळणे हे आवश्यक आहेत. लस हे सुरक्षा कवच आहे. लसनिर्मिती करणारे देश आणि कंपन्या जगात बोटावर मोजण्या इतक्याच असल्याचं मोदी म्हणाले.

दरम्यान, भारत इतक्या मोठ्या लोकसंख्येला कसं वाचवणार असा प्रश्न विचारला केला गेला. परंतू तुमची नियत साफ असेल तर यश येतं. भारताने वर्षभरात एकच नाही तर दोन मेड इन इंडिया लसींची निर्मिती केली आणि आपल्या शास्त्रज्ञांनी दाखवलं, भारत हा जगात मोठ्या देशांच्या मागे नाही, असं मोदींनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

येत्या 4 दिवसांत ‘या’ भागांमध्ये कोसळणार धोधो पाऊस; हवामान खात्याचा इशारा

मोस्ट डिझायरेबल वुमन 2020 यादीत रिया टाॅपला, द टाईम्सने केली यादी जाहीर

“अजितदादासोबत बांधावरची लढाई नाही, पण मी पक्षाबद्दल आणि मोदींबद्दल काहीच ऐकून घेणार नाही”

#कोरोना! घरी वाफ घेत असाल तर थांबा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स

अबब! स्वच्छतागृहात तब्बल साडेसहा फुटाचा नागोबा पाहून पोलिसाच्या तोंडचं पळालं पाणी 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More