बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“किरीट सोमय्या भाजपच्या आयटम गर्ल सारखे राजकारण करतात”

नांदेड | राज्यात आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.  राज्यात राजकीय नेते एकमेकांवर जहरी शब्दात टीका टिपण्णी करत आहेत. त्यातच आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली आहे.

बातमी कशी होईल यासाठी किरीट सोमय्यांचे प्रयत्न सुरू असतात. चित्रपट चालवण्यासाठी जशी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटत की, राजकीय क्षेत्रामध्ये किरीट सोमय्या भाजपच्या आयटम गर्लसारखे राजकारण करत आहेत. बातमी कशी होईल? यासाठी आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे, अशी जहरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक यांना मला काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे. त्यांनी गेल्या महिन्यात असं काही सांगितलं की, बीड जिल्ह्यात देवस्थानची जमीन कोणाला तरी दिली गेली. याची चौकशी करणार आहोत. खरं म्हणजे देवस्थानची जमीन धनंजय मुंडे यांनी खाल्ली. पंरतु, आता रायगडमधील कर्जत येथील जमिनीचा सातबारा माझ्या हातात आला आहे. आज मी जाऊन तो कन्फर्म करणार आहे. तसेच या देवस्थानची जमीन या व्यक्तीच्या नावावर कशी गेली याची चौकशी व्हायला हवी, असं किरीट सोमय्या म्हणाले होते.

दरम्यान, किरीट सोमय्या सोमवारी मंत्रालयात जात शासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसत काही फाईल्य चेक केल्या होत्या. किरीट सोमय्यांनी जर माहिती अधिकारामध्ये फाईल्स तपासल्या, जर त्यांनी फाईल तपासण्यासाठी परवानगी घेतली नसेल तर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर, डाॅक्टर म्हणतात…

“…त्यानंतर विराटने लग्न करायला पाहिजे होतं”, शोएब अख्तरने किंग कोहलीला डिवचलं

नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे युतीमधून…”

नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं! फक्त 30 मिनिटात जमवले 10 लाख अन्…

सतत आजारी पडताय? मग आहारात करा ‘या’ तीन गोष्टींचा समावेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More