Top News देश

दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मुख्यमंत्री घेणार लस!

नवी दिल्ली | 16 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री लस कधी घेणार?, असा सवाल विचारला जात होता. परंतू आता याला पूर्णविराम लागला आहे.

या मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती समोर येतं आहे.

तसंच, नंतरच्या टप्प्यामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नेतेमंडळींचा समावेश असेल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिली आहे.

दरम्यान, शनिवारपासून या अभियानास सुरुवात झाली असून देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकारने तयार केलेले ॲप नीट चालत नसल्यानं राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेत अडचणी येत आहेत.

थोडक्यात बातम्या-

सर्व्हरच बंद पडल्यानं लसीकरणात अडचणी- आरोग्य मंत्री राजेश टोपे

थकीत वीजबिलावरून सरकारला रोहित पवारांचा घरचा आहेर; म्हणाले…

‘कोणतीही अडचण असली तरी बैठकील यायचंच’; दांडीबहाद्दर मंत्र्यांना अजित पवारांनी खडसावलं

पराभव मान्य करा नाही तर लोकंच तुडवतील एक दिवस- निलेश राणे

मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात आहे; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या