बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘… या बाबतीत आम्ही मोदींचे शिष्य’; नवाब मलिकांचा भाजपवर निशाणा

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या राजकीय वर्तुळात आरोपांच्या मालिकेत केंद्रस्थानी आहेत. नवाब मलिक रोज नवनवीन खुलासे, रोज नवनवीन आरोप करताना पहायला मिळत असतात. त्यामुळे सध्या ते नेहमीच चर्चेत असलेले पहायला मिळतात.

आज नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवरुन वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या घरावर होत असलेल्या रेकीविषयी सांगितलं. मलिकांनी सध्या रेकी करणाऱ्यांचे फोटोही सोशल मीडियावरही शेअर केले आहेत.

पत्रकार परिषदेत नवाब मलिकांना ट्विटविषयी विचारणा केली असता त्यांनी भाजपवर निशाणा साधल्याचं पहायला मिळालं. सोशल मीडियाचा वापर मोदी साहेबांनीच आम्हाला शिकवलाय. या बाबतीत आम्ही त्यांचे शिष्य आहोत, असं नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सोशल मीडिया, ट्विटर, फेसबुकचा वापर कसा करायचा, हे आम्ही मोदींकडूनच शिकलो असल्याचंही मलिकांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद उभा राहण्याची शक्यता पहायला मिळू शकते.

थोडक्यात बातम्या – 

परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात; मुंबईत येताच अडचणी वाढल्या

‘वडिल पुस्तकाला पैसे देत नाहीत, रोज दारु पितात’, मुलाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल

“विदेशी माध्यमांना भारताचा विकास पचत नाही”

एसटी आंदोलनावरुन जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा, म्हणाले…

महागाईची झळ; सीएनजीपाठोपाठ आरे दूधही ‘इतक्या’ रुपयांनी महागले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More