बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचा पुन्हा उद्रेक! लसीकरणानंतर देखील ‘या’ देशात पाचव्या लाटेची शक्यता

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून जगातील विविध देशांमध्ये कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट आली आहे. काही देशात पाचवी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतात तिसरी लाट येणार अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यातच आता फ्रान्समध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रूग्णसंख्येने 24 कोटींचा टप्पा पार केला आहे.

सध्या भारतात कोरोनाचा वेग मंदावला आहे. ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा वेग मंदावला असला तरी फ्रान्समध्ये पुन्हा एकदा कोरोना रूग्ण वाढू लागले आहेत. रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. फ्रान्समध्ये पाचव्या लाटेची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

फ्रान्समध्ये नोव्हेंबर महिन्यात 33 हजार 427 रूग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. आता गेल्या 24 तासांमध्ये  रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या 6,483  इतकी आहे. फ्रान्ससोबतच ब्रिटनमध्येही कोरोना पुन्हा वाढताना दिसत आहे.

दरम्यान, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्टा व्हरिएंटमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे इथे आणखी एका लाटेचा धोका निर्माण झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण झाल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेत जगभरातील सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत सात लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर दुसरा ब्राझील तर तिसरा नंबर भारताचा आहे. सरकारी आकडेवारीनुसार भारतामध्ये आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

सुट्टी नाहीच! ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

“अजितदादांनी सांगितल्यामुळे शांत बसलो नाहीतर सोमय्यांचा तोतरेपणा काढला असता”

नरेंद्र मोंदीची का होतेय जेम्स बाँडसोबत तुलना?

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात घट; सर्वसामान्यांना दिलासा

“महाविकास आघाडीमध्ये राहायचं की नाही याचा लवकरच निर्णय घेऊ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More