बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रूग्णांना आवश्यक असलेल्या इंजेक्शनसाठी रुग्णालयाला द्यावं लागणार हमीपत्र

कोल्हापूर | कोरोनानंतर महाराष्ट्रात काळी बुरशी म्हणजेच ब्लॅक फंगस या नव्या आजाराने डोकं वर काढलं व बघता बघता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले. या रुग्णांवर उपचार सुरू असताना अॅम्फोटेरेसिन-बी इंजेक्शन आवश्यक आहे.

अॅम्फोटेरेसिन-बी या इंजेक्शनचा महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुरुवातीला कोरोना काळामध्ये रेमडेसिविर या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाला. तसेच बनावट रेमडेसिविर देखील बनवले गेले. त्यानंतर आता महाराष्ट्रात अॅम्फोटेरेसिन या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने जिल्ह्यातील काळाबाजार रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये रुग्णालयांना आता या इंजेक्शनसाठी हमीपत्र द्यावे लागणार आहे. तसेच इंजेक्शनच्या मागणीसाठी हमीपत्र द्यावे लागणार असल्याने काळाबाजार रोखण्यासाठी मदत होणार आहे.

अॅम्फोटेरेसिन हे इंजेक्शन म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे. तसेच सध्या कोल्हापुरात 84 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रेमडेसिविर सारखा काळाबाजार या इंजेक्शनच्या बाबतीत होऊ नये, यासाठी आरोग्य प्रशासनाने स्वतंत्र नियमावली बनवून या इंजेक्शनच्या पुरवठ्या संदर्भात माहिती जाहीर केली आहे.

थोडक्यात बातम्या

खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे- उद्धव ठाकरे

डान्स इंडिया डान्स फेम ‘या’ कलाकाराचा गंभीर अपघात; देतोय मृत्यूशी झुंज

सरसकट 9 ते 6 दुकानं उघडायला परवानगी द्या अन्यथा…

पुणेकरांनो विनाकारण गर्दी करू नका, अन्यथा…- अजित पवार

सकारात्मक बातमी! देशातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 15 लाखांच्या खाली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More