Top News राजकारण

योग्य वेळ आली की शिवसैनिकच नारायण राणेंना उत्तर देतील- अशोक चव्हाण

औरंगाबाद | शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. भाजप खासदार नारायण राणे यांनी सडकून टीका करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाला लायक नसल्याचं म्हटलं होतं. तर यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण यांच्या म्हणण्याप्रमाणे, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेबद्दल अशोक चव्हाण यांना विचारणा करण्यात आली. यावेळी चव्हाण म्हणाले, “नारायण राणे यांच्याविषयी मला काहीही बोलायचं नाहीये. राणे यांनी केलेल्या वक्तव्यांवर कोणीच प्रतिक्रिया देत नाही. याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या, त्यांची किंमत काय आहे ते.”

चव्हाण पुढे म्हणाले, नारायण राणेंनी केलेली टीका हा शिवसेनेचा विषय आहे. आणि यावर शिवसैनिकच त्यांना योग्य वेळ आली की उत्तर देतील. कारण ते पूर्वश्रमीचे शिवसैनिक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ कारणामुळे रोहित शर्माला वगळलं!

तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, आज केली वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी!

चंद्राच्या पृष्ठभागावर सापडलं पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांचा दावा

उद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही – कंगणा राणावत

“महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे मुख्यमंत्र्यांना कळणारही नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या