Top News क्राईम देश

आई रागावल्यानं मुलगी घराबाहेर पडली, नराधमांच्या कृत्यानं माणुसकी ओशाळली!

Photo Credit- Pixabay

पाटणा | बिहारमध्ये काल एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलं आहे. ही घटना पाटण्यातील दिघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पीडितेने तक्रार केल्यानंतर सोमवारी रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.

पोलिस ठाण्याच्या एसएचओ आरती कुमारी जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पीडित मुलीची आई तिला रागवल्यामुळे ती नाराज होऊन घरातून निघून गेली होती. दरम्यान तीन तरूणांनी मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिला फुस लावून गाडीवर बसण्यास सांगितले. त्यानंतर एका हाॅटेलमध्ये नेऊन तिच्यावर तिन्ही नराधामांनी बलात्कार केला.

पीडित मुलीने मदतीसाठी आरडाओरडा करताच हाॅटेलमधील कर्मचारी आवाजाच्या दिशेने धावत आले. मात्र तोपर्यंत संबंधीत आरोपी फरार झाले होते. आरोपींना पाटलीपुत्र स्टेशनजवळ पकडण्यात आलं, असा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी पाॅस्को कायद्याअंर्गत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

एसएचओ आरती कुमारी जयस्वाल यांच्या माहितीनुसार तिन्ही आरोपींची ओळख पटली आहे. संबंधीत आरोपींची नावं सूरज साव, कृष्ण कुमार आणि श्रवण गोस्वामी अशी आहेत. सूरज आणि कृष्ण कुमार दोन्ही भाऊ असून श्रवण त्यांचा मित्र आहे. तिन्ही आरोपी एकाच ठिकाणी राहत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी धोका, असं म्हणत शेतकरी बाप-लेकानं संपवलं आयुष्य

सेक्स कॉल… अभिनेते, नेते, खेळाडूंना मोठा धोका; पोलिसांची धडक कारवाई

पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?, ‘या’ माणसाचा सल्ला मोदी ऐकणार का?

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड काय म्हणाले?, वाचा जसंच्या तसं…

राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळाची रुपाली चाकणकरांनी उडवली खिल्ली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या