बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पवारांशी संबंधित कारखाने आणि संचालकांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी

पुणे | पवार कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आयकर विभागाच्या धाडसत्राला पुन्हा सुरूवात झाली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्याशी संबंधीत असणारे कारखाने आणि संचालकांच्या घरी आयकर विभागाने धडक दिली आहे. आज सकाळपासूनच आयकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

जरंडेश्र्वर साखर, अंबालिका शुगर, दौंड शुगर, पुष्पदनतेश्र्वर शुगर, नंदुरबार या खासगी कारखान्यांवर आयकर विभागाच्या वतीने कारवाई होत असल्याचं म्हटलं जात आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार हे सगळे कारखाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे आहेत. बारामतीतील डायनॅमिक्स डेअरीवर देखील छापा मारण्यात आला आहे.

ही डायनॅमिक्स डेअरी शरद पवारांचे निकटवर्तीय असणाऱ्या गोयंका कुटूंबाच्या मालकीची आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका शुगर हा कारखाना अजित पवारांच्या खासगी मालकीचा आहे. अंबालिका शुगरचे व्यवस्थापकीय संचालक जंगल वाघ यांच्या काटेवाडीतील घरीही तपास यंत्रणांनी धडक दिली आहे. जरंडेश्र्वर साखर कारखान्यातही आयकर विभागाची एक टीम दाखल झाली आहे.

केंद्रीय यंत्रणांनी कोणाला कानोकान खबर न लागू देता सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केली. पोलिस प्रशासनालाही कसलीच खबर न लागू देता सीआरपीएफ जवानांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. आज कारवाई झालेल्या सर्व संस्था आणि कारखाने हे पवारांशी निगडीत आहेत. त्यामुळे पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

थोडक्यात बातम्या-

‘येत्या 8 दिवसांमध्ये अटक केली नाही तर…’, राकेश टिकैत यांचा योगी सरकारला इशारा

‘या’ पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय; धनंजय मुंडेंनी दिली माहिती

भीषण अपघात! बस आणि ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू, 27 जण रुग्णालयात

नरेंद्र मोदींनी वाहिली नटू काकांना श्रद्धांजली, जुना फोटो शेअर करत म्हणाले….

केंद्र सरकारकडून ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांना मोठा बोनस जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More