बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारविरोधात बोलणाऱ्या कलाकारांच्या घर आणि कार्यालयांवर इनकम टॅक्सची धाड

मुंबई | सोशल मीडियावर आपल्या भूमिका मांडून कायम चर्चेत असलेला बॉलिवुडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अुनराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याकडे आयकर विभागाने आपला मोर्चा वळवलेला दिसत आहे. आयकर विभागाच्या पथकांनी कश्यप आणि पन्नूच्या मुंबईतील मालमत्तेवर छापे टाकत झाडाझडती चालु केली आहे. अचानक पडलेल्या धाडीमुळे बॉलिवूड विश्व हादरून गेलं आहे.

अुनराग कश्यप आणि तापसी पन्नू या कलाकारांवर इन्कम टॅक्स चोरीचे मोठे आरोप असल्याचं सांगण्यात येत आहे. या छाप्यात आयकर विभागाला काय मिळाले हे लवकरच समोर येईल. ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या धाडी टाकण्यात आल्या असल्याची माहिती आहे. तर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले आहेत.

‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांनी कर चोरी केल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं आयकर विभागानं सांगितलं आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी 2011 मध्ये सुरू केली होती. मात्र विकास बहल यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता. त्यानंतर अनुरागने त्याला कंपनीतून बाहेर केलं होतं.

दरम्यान, अनुराग कश्यप सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत असतो. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून टीका केली होती. पंतप्रधान मोदींना मुका आणि बहिरा अशा शब्दात त्याने टीका केली होती तर अभिनेत्री कंगणा राणावतवरही निशाणा साधला होता.

थोडक्यात बातम्या-

सरकारी धोरणांना विरोध करणं म्हणजे देशद्रोह नाही- सर्वोच्च न्यायालय

तरुणीसोबत अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप मंत्र्याचा राजीनामा

धक्कादायक! मंत्र्याच्या सेक्स सीडीतील आणखी एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

पेट्रोल चोरांचा थेट पाईपलाईनवर डल्ला; पेट्रोलनं दोन विहिरी भरल्यानं महाराष्ट्रात खळबळ

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ बड्या टोळीच्या म्होरक्याला केलं अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More