बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी वसुलीचा लेटर बॉम्ब टाकल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या या पत्रामुळे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर सध्या अनिल देशमुख यांच्यावर ईडीच्या अटकेची टांगती तलवार लटकली आहे. मात्र आता परमबीर सिंग यांच्याच अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ठाण्यात परमबीर सिंग यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात राहणाऱ्या शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीनं हा परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आरोप केला आहे. परमबीर सिंग यांनी दोन कोटी रूपयांची खंडणी मागून बळजबरीने जमीन नावावर केल्याचा आरोप शरद अग्रवाल यांनी केला आहे. त्यांच्यासह संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत.

परमबीर सिंग आणि आणखी 6 जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. संजय पुनामिया आणि सुनील जैन हे दोघे परमबीर सिंग यांच्यासाठी खंडणी वसूल करायचे, असा आरोप देखील शरद अग्रवाल यांनी केला आहे.

दरम्यान, 100 कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडी परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवणार आहे. याबाबत परमबीर सिंग यांना समन्स देखील बजावण्यात आला आहे. पोलीस प्रशासन प्रमुख असलेले ते निर्दोष आहेत, असा दावा करू शकत नाही. कारण ते देखील यात समान जबाबदार आहे, असं उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सांगलीत कृष्णेचा रूद्रावतार ; 1 लाख 96 हजार 957 नागरिकांचं स्थलांतर

काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन!

PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे येणार

भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकन फलंदाज फेल; टी-20 सामन्यात भारताचा दमदार विजय

“आता प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More