बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ईडी कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणार

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी वसुलीचा लेटर बॉम्ब टाकल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या या पत्रामुळे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर सध्या अनिल देशमुख यांच्यावर ईडीच्या अटकेची टांगती तलवार लटकली आहे. मात्र आता अनिल देशमुख यांच्यानंतर परमबीर सिंग यांनाही ईडीच्या कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत.

100 कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडी परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवणार आहे. याबाबत परमबीर सिंग यांना समन्स देखील बजावण्यात आला आहे. पोलीस प्रशासन प्रमुख असलेले ते निर्दोष आहेत असा दावा करू शकत नाही. कारण ते देखील यात समान जबाबदार आहे, असं उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटलं आहे.

परमबीर सिंग यांनी ईडी समोर हजर राहण्यासाठी आरोग्याच्या कारणास्तव काही अवधी मागून घेतला होता. पण, आता दुसरीकडे अनिल  देशमुख यांना तिसरा समन्स बजावल्यानं आता परमबीर सिंग यांना सुद्धा ईडीच्या समोर हजर राहावं लागणार आहे. याच प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने एकामागून एक असे तीन समन्स पाठवले होते. मात्र अनिल देशमुख यांनी चौकशीला हजर राहण्यास नकार दिला होता.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी म्हणजे नागपूरमध्ये ईडीने छापे टाकले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी या प्रकरणात सल्ला घेण्यासाठी दिल्ली दौरा केला होता. तर अनिल देशमुख यांचे स्वीय  सहाय्यक संजीव पालंडे आणि कुंदन शिंदे या दोघांना ईडीने अटक केली होती.

थोडक्यात बातम्या-

संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात?; उदय सामंत यांचं सुचक वक्तव्य

“…तरच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी होईल”

घरात पूजा करताना जळत्या कापरामुळे लुंगीने पेट घेतला; मुंबई महापालिकेच्या माजी आयुक्तांचा मृत्यू

कोरोना रुग्णांना बेल्स पाल्सीचा धोका?; ‘ही’ लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा

“मुख्यमंत्र्यांना तीन पत्र लिहिली, उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत की काय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More